रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात

  • संगमेश्वर तालुकाध्यक्ष पदाची माळ बाबा साळवी यांच्या गळ्यात
  • देवरूखातील जिल्हा कार्यकर्ता बैठकीनंतर नेमणूक जाहीर

देवरूख (सुरेश सप्रे ) : संगमेशर तालुक्याला शरद पवार गटाला नवीन तालुकाध्यक्ष मिळला आहे. तालुकाध्यक्षपदी विवेकानंद तथा बाबा साळवी याची वर्णी लागली आहे.
शरद पवार गट राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे विवेकानंद उर्फ बाबा साळवी यांचे नाव आघाडीवर होते. त्यांची नेमणूक आज प्रदेश राज्य सर चिटणीस रविंद्र पवार यांनी जाहीर केली. साळवी हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. या शिवाय राज्य चिटणीस सुरेश बने यांचे समर्थक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

सद्यस्थितीत तरी बाबा साळवी यांची नेमणूक ही आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी हे धोकादायक ठरू शकते.
रमेश कदम व सुरेश बने गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यात संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. शेखर निकम यांचे बरोबर असणारे अनेक जण आता काय भुमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आता कोण कोण उघडपणे वा झुपेपणे काय भुमिका घेतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हातील चार तालुक्यातील नेमणूका करण्यात आल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने या नेमणुका सरचिटणीस पवार यांनी तसे पत्र प्रसिद्ध करत या नवीन नेमणूका करण्यात आल्या. त्यात संगमेश्वर तालुकाध्यक्ष अध्यक्ष म्हणून बाबा साळवी. तर खेडचे अध्यक्ष उमेश पवार. चिपळूण चे अध्यक्ष मुराद अडरेकर. तर लांजा चे अध्यक्ष अनंत आयरे यांची नेमणूक करण्यात आली आहे..
बाबा साळवी यांची तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याने तालुक्यातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE