रत्नागिरी : शिकेल तो टिकेल या मोहिमे अंतर्गत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २० येथे छत्री-२५ तसेच शालेय उपयोगी वस्तू (लिखाणाचे पॅड- २५ , बैठक-२५ , रंगीत खडू-२० ), यासह शात्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि देवी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा देखील विद्यार्थाना आणि शाळेला भेट देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी छत्र्या या रोटे. मंदार आचरेकर आणि बाकी सर्व शालेय वस्तू रोटे डॉ. मनीषा भागवत यांनी उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाला शाळेतील मुख्याधिपिका उकिडवे आणि श्री. करमरकर तसेच सर्व विद्यार्थी उपस्थति होते. रोटरी क्लबतर्फे अध्यक्ष श्रीकांत भुर्के , प्रमोद कुलकर्णी , धरमसी चौहान , ऋता पंडित, वेदा मुकादम, डॉ. अविनाश भागवत, डॉ. मनीषा मंदार आचरेकर, देवयानी वाघधरे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करमरकर सर यांनी केली. यावेळी ऋता पंडित यांनी लहान मुलांबरोबर छान सवांद साधला आणि त्यांना शिकून चांगले मोठे होऊन तुम्हीदेखील अशा छान छान गोष्टी पुढच्या पिढीला देण्याबद्दल सांगितलं.जेष्ठ सदस्य धरमसी काका यांनी त्यांच्या शाळेतील आठवणी मुलांसमोर मांडल्या. अध्यक्षानी देखील मुलांना मार्गदर्शन केले आणि येत्या काळात काही गरज लागल्यास रोटरी क्लब नक्की मदत करेल अशी ग्वाही दिली . कार्यक्रमाची सांगता मुख्याधिपिका उकिडवे यांनी केली
