संगमेश्वर दि. १५ ( प्रतिनिधी ): स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे मंगळवारी दहावी – बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते

प्रारंभी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये, सदस्य रमेश झगडे, समीर शेरे, बाबा नारकर, परिमल शेरे , अभिषेक विचारे, गुरव, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सदस्य रमेश झगडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावीत विशेष उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी कलाशिक्षक जितेंद्र पराडकर यांचाही संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाच वर्षांच्या छोट्या शेरे या मुलाने सुरेल आवाजात देशभक्तीपर गीत सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली . प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन सादर केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता शेट्ये यांनी केले . संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .
