Mumbai-Goa Highway : निवळी घाटात कारला धडक देऊन गॅस टँकर दरीत कोसळला

अपघातग्रस्त टँकरचालकासह कारमधील प्रवासी बचावले

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात पुन्हा एकदा तेथील एका अवघड वळणावर एलपी गॅस टँकरने कारला धडक दिल्यानंतर टँकर थेट दरीत कोसळला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, कारमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. यातील टँकरचालक देखील बचावला असून तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. १५ ऑगस्ट २०२३) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, हवालदार घाग, हवालदार, अंब्रे, हवालदार मुरकर, हवालदार संसारे, हलालदार शिंदे  तत्काळ घटनास्थळी  दाखल झाले. तसेच ग्रामीण पो. ठाण्याचे कर्मचारी अधिकारी देखील दाखल झाले. सुरक्षेच्यादृष्टीने Midc अग्निशामक दलाचाi गाडीसह सात कर्मचारीी घनास्थळी दाखल झाले. 

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार तालुक्यातील जयगड येथून हा टँकर गॅस भरून नाशिकला जात होता; परंतु निवळी घाटात अचानक टँकरचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टँकरने एका कारला धडक देत टँकर थेट तीस ते चाळीस फूट खोल दरीत कोसळला.

अपघातानंतर गॅस टँकरमधून वायूगळती होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने एमआयडीसी येथील सात कर्मचारी दाखल झाले. टँकर चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी टाकत आपला प्राण वाचवल्याचे बोलले जात आहे. मात्र तो घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात टँकरने धडक दिलेल्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे

Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE