शिंदे गटाला झटका असल्याची तालुक्यात चर्चा सुरू
संगमेश्वर : तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या सहकार्यासह शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत गेलेले आंबव गावचे माजी सरपंच व माजी मंत्री रवींद्र माने याचे बंधू रूपेश तथा बाळा माने हे आपल्या बंधूच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर परत उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे..
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी हे तळ्यात मळ्यात होते. प्रथम माजी आम. सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केलेवर संगमेश्वर तालुक्यातील अनेकजण हि शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित होते. त्या नंतर तालुकाप्रमुख प्रमोद पवार हे गेली २७ वर्षे तालुका प्रामाणिक पणे सेना वाढविण्यासाठी प्रयत्न करत होते. पण सेनेत मोठी फुट पडल्यावर प्रमोद पवार यांनी आपल्या सहकार्यासह ना. उदय सामंत यांचे उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटात प्रवेश केलेले आंबव गावचे माजी सरपंच व माजी मंत्री रवींद्र माने यांचे बंधू रुपेश (बाळा) माने यांनी हि प्रवेश केल्याने एकच खळबळ उडून माजी मंत्री रवींद्र माने हे ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार कि काय याची उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. पण अफवाच ठरली होती.
आता माजी मंत्री रवींद्र माने यांचा ६५वा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा उबाठा शिवसेना व माने मित्र मंडळ यांचेवतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.. त्याचे औचित्य साधून शिंदे गटात गेलेले रवींद्र माने याचे बंधू व आंबवचे विद्यमान उपसरपंच रुपेश माने हे खास विनायक राऊत यांचे उपस्थितीत पुन्हा स्वगृही उबाठा सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आता रुपेश माने हे आपल्याबंधूच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर परत उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश करणार की शिंदे गटातच राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
