- माखजन हायस्कूल येथे झाली स्पर्धा
संगमेश्वर दि. १८ ( प्रतिनिधी ) : व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरची विद्यार्थीनी प्रांजल प्रमोद गुरव हिने माखजन इंग्लिश स्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

अखिल भारतीय विज्ञान मेळावा तर्फे आयोजित या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत भरडधान्य : उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम या विषयावर प्रांजल प्रमोद गुरव इयत्ता ९ वी हिने सहा मिनीटांच्या वेळेत आपले मत मांडले. प्रांजल हिला अर्चिता कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत प्रांजलने प्राप्त केलेल्या तृतीय क्रमांकाबद्दल तिचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी अभिनंदन केले आहे.
- हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
- Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
