भाजपच्या कुवारबाव विभागीय कार्यालयात आभा कार्डसह नव मतदार नोंदणी शिबीर

  • शिबिरात यावेळी सुमारे १९० जणांची आभा कार्ड नोंदणी
  • ९२ नवीन मतदारांची शिबिरात नोंदणी

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी नाचणे विभागीय कार्यालय कुवारबाव येथे रविवार दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी मोफत आभा कार्ड नोंदणी व नवीन मतदार नोंदणी शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबवण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष भाजपा दक्षिण श्री. राजेश सावंत आणि माजी आमदार सुरेन्द्र तथा बाळासाहेब माने यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतेज नलावडे, नितीश अपकरे, रसिक कदम, धनंजय जोशी व श्री. दीपक आपटे यांनी मेहनत घेतली. हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या मागणीवरून परत घेण्यात आला. यामध्ये कुवारबाव, नाचणे, पोमेंडी, खेडशी, मिरजोळे व अन्य आसपासच्या गावातील लोकांनी लाभ घेतला. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजना समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


या शिबिरात यावेळी जवळपास १८५ ते १९० लोकांनी आभा कार्ड नोंदणी केली तर जवळपास ९२ नवीन मतदार नोंदणी करण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE