सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांचा कलाविष्कार पटवर्धन हायस्कूलमध्ये झळकला!

  • प्रदर्शनाचे आयोजन
  • बंदर , मंदिरे आणि निसर्ग देखावे
  • विद्यार्थ्यांच्या कुंचल्याचा सुंदर आविष्कार

संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ) : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रतिवर्षी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गात जाऊन चित्रकलेचे प्रत्यक्ष धडे मिळावेत यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी व ऐतिहासिक स्थळांवर नेले जाते. तेथे जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गाशी समरस होऊन ते दृश्य कागदावर उमटवितात. तेथील झाडे, डोंगर, नदी, घरे, माणसे अशी विविधांगी रेखाटने विद्यार्थी आपल्या कलेतून उमटवितात.या शैक्षणिक सहली दरम्यान मुलांनी काढलेली चित्र व शिल्पांच्या प्रदर्शनाचे उदघाट्न कॅ. सुभाषचंद्र ठाकूर सभागृह पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी या ठिकाणी दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी सकाळी १० वा.करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक अनिल दधिच (सी. एस. आर -हेड जेएसडब्लू, फौंडेशन -रत्नागिरी ), प्रमुख पाहुणे म्हणून नमिता रमेश किर ( कार्याध्यक्ष भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी), महेश महाडिक (सेक्रेटरी, सह्याद्रि शिक्षण संस्था ) राजेंद्र स.कांबळे( मुख्याध्यापक पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), रुपेश पंगेरकर( कला शिक्षक पटवर्धन हायस्कूल), इम्तियाज शेख, राजन अहिरे,सौ.मेघना आयरे , विशाल ठोकळे उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अनिल दाधिच म्हणाले की, अशा खूप सुंदर केलेल्या कलेचे व्यवहारिक दृष्टिकोनातून रूपांतर झाले पाहिजे.विद्यार्थ्यांनी आपल्या कामाचा फोकस आणि पॅशन ओळखली पाहिजे. कोकणात कला मुळंताच असल्यामुळे येथील कला विद्यार्थ्यांची कामे सुंदर आहेत. अशा कला विद्यार्थ्यांसाठी जे.एस.डब्ल्यू कंपनीतर्फे कलादालन निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करून अशी ग्वाही देतो. तसेच रत्नागिरीत ज्याप्रमाणे हापूस आंबा प्रसिद्ध आहे त्यासारखी इथली कला प्रसिद्ध आहे.

श्रीम. नमिता रमेश किर बोलताना म्हणाल्या की, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट हे नामवंत कला महाविद्यालय आहे. त्यामुळे आमच्या वास्तुत झालेले हे कला प्रदर्शन म्हणजे हे आमचे भाग्यच आहे.या कलाप्रदर्शनात मांडलेल्या चित्र शिल्पांना पारितोषिक देण्यात आली.या प्रदर्शनात मांडलेल्या चित्र शिल्पांचे परीक्षण चित्रकार रुपेश पंगेरकर व चित्रकार -दिलीप भातडे यांनी केले.यातून उत्कृष्ट दहा व विशेष पाच पारितोषिक काढण्यात आली.

उत्कृष्ट कलाकृती पारितोषिक -प्रितेश गोणबरे, विशाल मसणे, श्रीनाथ मांडवकर, करण आदावडे, ईशा राजेशशिर्के, सायली कदम, सुजल निवाते, राज वरेकर, प्रदीपकुमार, शुभम जाधव, विशेष पारितोषिक -राकेश भेकरे, भार्वी गोरुले, शुभम वाडये, स्वयम वर्दम, साक्षी रेवणे तसेच जे एस डब्ल्यू तर्फे पाच बक्षीस देण्यात आली. कु. साईराज मिराशी, कु. सायली कदम, कु. सौरभ साठे, कु. सुजल निवाते, कु. ईशान खातू यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच या प्रदर्शनात प्रदर्शित होणाऱ्या चित्रांची लिलावस्वरूपात विक्री होणार आहे.हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य दि.३१ ऑगस्ट २०२३ ते २ ऑगस्ट २०२३ पर्यंत खुले राहणार आहे.तरी सर्व कलाप्रेमी, कलारसिक यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE