उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

रत्नागिरी, दि.११ (जिमाका) :- राज्य शासनाने, दिनांक १९.९.२०२३ पासून सुरू होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. १५.९.२०२३ पर्यंत अर्ज करावा. स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्हयातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लक्ष, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लक्ष व तृतीय क्रमांकास रुपये १लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. ४.०७.२०२३ चा शासन निर्णय व दिनांक ३०.०८.२०२३ च्या शासन शुध्दीपत्रकात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमुद केले आहेत तसेच सोबत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE