रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप येथील श्री. अनंत पुरूषोत्तम साळवी यांच्या घरी स्थानापन्न झालेली श्री ची मुर्ती व घरगुती गणेशोत्सवातील भगवान श्री विष्णूचे दशावतार हा देखावा मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सजावट स्पर्धेत द्वितीय क्रमांकांचा विजेता ठरला तर कांचन डिजिटलने आयोजित केलेल्या गणेश सजावट स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.
