Konkan Railway | चिपळूण-दिवा मेमू स्पेशलच्या फेऱ्यात ३ ऑक्टोबरपर्यंत

  • पूर्णपणे अनारक्षित गाडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी दिवा- चिपळूण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या मेमू स्पेशल गाडीच्या फेऱ्या दि. 3 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. चिपळूणसाठी मेमू स्पेशल गाडीमुळे नेहमीच गाड्यांचा कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी दिवा ते चिपळूण मार्गावर दि. 13 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येत आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक 13 सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 2023 या कालावधीत दिवा-चिपळूण मेमू स्पेशल गाडीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.

दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल 01155/01156 गाडी दिवा येथून सायंकाळी ७ वाजून 45 मिनिटांनी सुटून चिपळूणला ती रात्री एक वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे.
चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुपारी १ वाजता सुटून रात्री सात वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल.

दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे

पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड तसेच अंजनी.

पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेने रत्नागिरी पर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडी देखील जाहीर केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE