डॉ. प्रसाद कामत करणार तपासणी
रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये दर महिन्याच्या शिबिराप्रमाणे डोळ्यांच्या रेटिना तपासणी करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारपासून (दि. २८) ते ३० सप्टेंबरपर्यंत या शिबिराचे आयोजन साळवी स्टॉप येथील इन्फिगो हॉस्पीटलमध्ये केले आहे. यात रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत तपासणी व उपचार करणार आहेत.
गेल्या तीन वर्षांत तब्बल २ लाख २० हजार नेत्र तपासणी करण्यात आली असून १२०० हून अधिक अवघड, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डायबेटीस असणाऱ्या ५५ हजारांहून अधिक रुग्णांच्या पडद्याची तपासणी करण्यात आली. डायबेटीस किंवा अन्य कारणामुळे डोळ्यांच्या पडद्यावर परिणाम झाल्यास अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. परंतु वेळीच तपासणी केल्यास पडद्याची शस्त्रक्रिया, उपचार करता येतात. डॉ. कामत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हॉस्पीटलमध्ये तपासणी करतील. याकरिता पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरीत सप्टेंबर २०२० पासून साळवी स्टॉप येथे इन्फिगो आय केअर हॉस्पीटल सुरू झाले. तीन वर्षांत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ४० वर्षांपेक्षा अधिय वयाच्या व्यक्ती, अचानक दृष्टी कमी झाली असेल तर, डोळ्यांपुढे काळे ठिपके असल्यास, डायबेटीस असल्यास, ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास, चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास, पडद्यावर सूज अथवा रक्तस्राव असेल तर किंवा -३ पेक्षा जास्त नंबरचा चष्मा असेल तर डॉक्टरांकडे रेटिना तपासणी करावी. अधिक माहितीसाठी 9372766504 या क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन हॉस्पीटलतर्फे केले आहे.
