परतीच्या पावसाच्या तडाख्याने तुरळ शाळा इमारतीचे छप्पर उडाले

सरपंचांनी केली पाहणी ; मोठे नुकसान

संगमेश्वर : गणेशोत्सवात पुनरागमन केलेल्या पावसाने सरिंच्या स्वरूपात कोसळण्यास सुरुवात केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीचा पाऊस सुरु झाला असून, आणखी चार दिवस जिल्ह्यात तो मुसळधार पडणार आहे. जोर घेतलेल्या पावसाने मंगळवारी ( दिनांक26 सप्टेंबर 2023) सायंकाळी पुन्हा संततधार धरली. तुरळ येथे जोरदार पडलेल्या पावसामुळे तेथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने शाळेतील मुलांना गणपतीची सुट्टी असल्याने कोणताही पअनर्थ ओढवला नाही.

सोमवारी पहाटेपासून पावसाने संततधार धरली होती. दुपारच्या वेळेत थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. पाच वाजल्यापासून पावसाने संततधारेने पडण्यास सुरुवात केली. कोसळत असलेल्या पावसाने तुरळच्या प्राथमिक शाळेचे कौलारू छप्पर उडवून टाकले. यामध्ये दोन वर्ग खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तुरळचे सरपंच सहदेव सुवरे, पोलिस पाटिल वर्षां सुर्वे, मुख्यधापक जयवंत शिंदे यांनी पाहणी केली.

हवामान खात्याने पावसाचा परतीचा प्रवास सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र, परतीचा प्रवास करताना जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. यंदा पावसाचे प्रमाण गेल्या वर्षापेक्षाही कमी आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE