आरटीआय सर्वसामान्यांशी निगडीत : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

  • आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळा



रत्नागिरी : आर टी आय सर्वसामान्यांशी निगडीत असून, त्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. सर्वांनाच त्याचा फायदा होत असतो. त्याबाबत चांगले काम करत रहा, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.


आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयामधील सभागृहात कार्यशाळा झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, विशेष भू संपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसिलदार तेजस्विनी पाटील, विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
सर्वसाधारण तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी माहितीचा अधिकार बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, माहिती अधिकाराबाबत खूपजणांचे योगदान आहे. हा कायदा जाब विचारण्याचे स्वातंत्र्य देत आहे. पारदर्शी कारभारासाठी हा कायदा महत्वाचा आहे. शेवटी तहसीलदार म्हेत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE