रत्नागिरी : देशातील अलिशान वंदे भारत एक्सप्रेसला कुणालाही अपेक्षा नसताना खेड स्थानकावर थांबा दिल्यानंतर दोन एक्सप्रेस गाड्यांना नव्याने थांबे, गणेशोत्सवात परतीच्या प्रवाशांसाठी मेमू स्पेशल गाडी आणि आता खेडवासियांसाठी कोकण रेल्वेने पुन्हा एकदा मेमू स्पेशल गाडी जाहीर केली आहे. ही गाडी पूर्णपणे अनरिझर्व्हड असेल.
खेडसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेली मेमू स्पेशल गाडी खेड येथून दि. १ व २ ऑक्टोबर २०२३ रोजी पनवेल ते खेड मार्गावर चालवण्यात येणार आहे. वीकेंडला मुंबईकडे परतताना होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे हे नियोजन केले आहे
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार पनवेल खेड मेमू स्पेशल (07105) ही गाडी पनवेल येथून दिनांक 30 सप्टेंबर व एक ऑक्टोबर 2023 रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या एक वाजता ती खेड स्थानकावर पोहोचेल.
खेड ते पनवेल मार्गावर धावताना ही मेमू गाडी (07106) दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी निघेल आणि त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता ती पनवेलला पोहोचेल.
खेड पनवेल मेमू स्पेशलचे थांबे
रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी.
हेही वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी मेमू ट्रेन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!
Konkan Railway | चिपळूण-दिवा मेमू स्पेशलच्या फेऱ्यात ३ ऑक्टोबरपर्यंत
