रत्नागिरी : निरामय योगा संस्था रत्नागिरीतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दि. ११ ऑक्टोबर रोजी १०० विद्यार्थ्यासाठी योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
निरामय योगा संस्थेचे पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रिय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने, प्राणायाम, मुद्रा, ॲक्युप्रेशर इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली तसेच विद्यार्थ्याकडून करून देखील घेतली.
योगाचे फायदे, योगाच्या नियमित सरावाने सर्व आजार अगदी पहिल्या दिवसापासून नियंत्रणात येतात आणि नियमित योग सरावाने सर्व आजार पूर्ण बरे कसे होतात, याची माहिती विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले. २ तास योग सराव करून मुलांनी आपले अनेक प्रश्न स्वामी सरांना विचारले आणि स्वामी सरांनी सर्व प्रश्नांची छान उत्तरे दिली.

वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन जयप्रकाश रामानंद सर आणि डॉ. शैलेश गवंडे यांनी स्वामी सरांचे आणि त्यांचे सहकारी उपेंद्र सुर्वे, शरद नागवेकर, स्नेहल नागवेकर, किंजल मोरे, शिवराज स्वामी, आरती स्वामी, लक्ष्मी स्वामी यांचे आभार मानले.
