रत्नागिरी : र.ए. सोसायटीची रा.भा. शिर्के प्रशालेतील कुमारी स्वरा विकास साखळकर हिने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत दोन कांस्य पदकांची कमाई केली. उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील नोयडा येथे दि. ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी ओपन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून विविध अनेक खेळाडू या स्पर्धेकरीता दखल झाले होते. रत्नागिरीमधील एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने 2 कास्यपदके मिळवून रत्नागिरीचे नाव नोएडामध्ये झळकावले.
स्वरा हिने आजपर्यंत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकवेळा विशेष ठसा उमटवला होता. स्वरा हिने आजपर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धेत 23 सुवर्णपदके,2 रौप्य तर 4 कास्यपदके तर राज्यस्तरीय स्पर्धेत 1 सुवर्णपदक तर 1 रौप्य पदक मिळविले आहे. नोएडा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रथमच खेळताना स्वरा हिने पुमसे प्रकारात एक कांस्यपदक तर क्युरोगी प्रकारात एक कांस्यपदक मिळवून 2 पदके आपल्या नावावर केली. या स्पर्धेकरीता स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्वरा ही शिर्के हायस्कूलची विद्यार्थिनी असून इयत्ता 5 वी मध्ये शिकत आहे.स्वराच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नोएडा येथील या स्पर्धेत स्वराने मिळवलेल्या यशाबद्दल र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी , शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण, उपमुख्याध्यापक श्री. कुमारमंगल कांबळे, पर्यवेक्षिका सौ. पूनम जाधव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
