- माजी खासदार नीलेश राणे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती
- रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा होणार सन्मान
रत्नागिरी : प्रहार Digital News Channel, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान आयोजित online घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी प्रहारचे संचालक माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी रत्नागिरीतील विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सन्माननीय महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रहार Digital News Channel, दै. प्रहार आणि मातृभूमी प्रतिष्ठान तसेच Balaji Security and Facilities Services , नृत्यार्पण नृत्य अकादमी आणि नंदाई Digital मार्केटिंग यांच्या वतीने यंदा प्रथमच Online घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा बक्षीस वितरण समारंभ रत्नागिरी शहरातील शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात रविवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. तर रविवारपासूनच नवरात्रीचा उत्सव सुरु होत आहे.
या निमित्ताने रत्नागिरीतील विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा याच कार्यक्रमात सन्मान होणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे, उद्योजिका वैशाली राजेंद्र जोशी, जिल्हा उद्योग विभागाच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खो खो पटू अपेक्षा सुतार, ऐश्वर्या सावंत, प्रगतीशील महिला शेतकरी सौ. संगीता वैद्य, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सौ. सुरेखा पाथरे, सहकार क्षेत्रात महिलांना एकत्र आणून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणाऱ्या प्राची शिंदे यांचा समवेश आहे.
संपूर्ण जिल्हाभरातून online घरगुती गणेश सजावट स्पर्धेत लांजा तालुक्यातील हर्दखळे येथील महेश शांताराम गुरव यांना प्रथम क्रमांकाचे 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक बक्षीस मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकाचे 7 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक पारितोषित अरुण काशिनाथ पालटे, गव्हे पवारवाडी दापोली यांना तर कल्पेश विकास रेळेकर, दापोली यांना तृतीय क्रमांकाचे ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक पारितोषिक प्राप्त झाले आहे. तर हातखंबा डांगेवाडी सागर सुरेश डांगे आणि आशिष अविनाश वाडकर, मिरजोळे यांच्या देखाव्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण रुपेश पंगेरकर आणि निलेश पावसकर या कला शिक्षकांनी केले.
या विजयी स्पर्धाकांसोबातच सहभागी स्पर्धकांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
