चिपळूण : पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देवून कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाण पुलाची पाहणी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी सविस्तर माहिती दिली. दोनच दिवसांपूर्वी बहादुरशेख येथील या पुलाच्या कामाला तडे गेल्यानंतर स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडून पाहणी सुरू असतानाच रविवारी दुपारी हा पूल कोसळला होता.
या दुर्घटनेनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी भल्या पहाटे कोसळलेल्या पुलाची पाहणी केली होती. त्यानंतर आज दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील चिपळूण मधील कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली.
