उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यामध्ये बौद्ध वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेऊन पुढील कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला.

यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व उरण तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत कार्यक्रम पार पडले . यावेळी बौद्ध बांधवांसाठी प्रवचन देण्यात आले असून अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय बौद्ध महासभेचे उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले. यावेळी सभा अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष एम. डी. कांबळे, महिला अध्यक्ष सुरेखा पवार, गायकवाड गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रम स्थळी उरण तालुक्यातील बदामवाडी सिद्धार्थ नगर, मांगिरा संघर्ष नगर, बौद्धवाडा, एन.जी.एल. गेट, नाईक नगर, चारफाटा, सावित्रीबाई फुले, बौद्धवाडा तसेच उरण तालुक्यातील विविध क्षेत्रातून बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संजय गायकवाड यांनी ठिकठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध असल्याचा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम व लग्न, आदी कार्यक्रमासाठी होणाऱ्या अडीअडचणी म्हणजेच कागदोपत्री दप्तर, व बौद्धाचारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बौद्ध बांधवानी आंनद व्यक्त केले आहे.
