रत्नागिरी, दि.22(जिमाका): लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन आले.
नवीन इमारतीच्या तळमजला 1286-71 चौ.मी, पहिला मजला 1287.71 चौ.मी, तर दुसऱ्या मजल्यावर 644.64 चौ.मी असे एकूण 3218.06 चौ.मी बांधकाम असणार आहे. रेनवॉटर हावॅस्टींग, पार्कींग सुविधा देखील असणार आहेत. 10 कोटी 10 लाख 47 हजार 63 रुपयाचे यासाठी अंदाज पत्रक असून, 24 महिन्याचा कालावधी आहे.
आजच्या या भूमिपूजन समारंभास मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार,अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.
