रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. दावते इस्लामी शाखा, रत्नागिरी यांच्यातर्फे ग्यारवीं शरीफ सणाचे औचित्य साधून इज्तिमा आयोजित करण्यात आला आहे
कोकणनगर नगर मद्रसा फैजाने अत्तार येथे हा तालुकास्तरीय इज्तिमाचे होणार आहे. इज्तिमा रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होईल. इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात येईल.
कोकण नगर येथील या इज्तिमामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे
