सक्रीय राजकारणातून कायमचा बाजूला होत असल्याच्या नीलेश राणे यांच्या ट्विटने खळबळ

मुंबई : राजकारणात मान रमत नसल्यामुळे सक्रिय राजकारणातून आपण कायमचे बाजूला होत असल्याचे ट्विट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्री. श्री राणे यांनी अचानक अशी भूमिका का घेतली याबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम मिळाले आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’ असे श्री. राणे यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE