संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन!

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे भाविकांनी बुधवारी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.

संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर व सहकाऱ्यांनी गाभाऱ्यासमोर विविधरंगी फुलांची नेत्रदीपक अशी आरास केली होती.

आमच्या यूट्यूब चैनलला आवर्जून सबस्क्राईब करा

गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. त्यातही अंगारिका यात्रा संकष्टी चतुर्थीदिनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक आवर्जून येथील मंदिराला भेट देऊन दर्शन रांगांमध्ये शिस्तबद्धपणे श्रींचे दर्शन घेतात.

बुधवारी देखील दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर अनेक भाविकांनी मंदिरालगतच असलेल्या रमाणीय समुद्र चौपाटीवर फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE