उरण दि. २ (विठ्ठल ममताबादे ) : कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते अनेक विविध विकास कामांचे भूमिपूजन,उदघाटन होत असून त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. जिल्हा परिषद निधीतून गव्हाण जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या जिल्हा परिषद फंडातून गव्हाण येथे पिण्याच्या पाण्याची टाकी नियोजित असून या कामाचे भूमिपूजन कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी गव्हाण जिल्हा परिषद सद्स्य रविंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायत सद्स्य पंकज पाटील, ग्रामस्थमंडळ बेलपाडा खजिनदार संतोष म्हात्रे, सचिव आतिश पाटील,सहसचिव बाळु देशमुख,प्रसाद म्हात्रे,महेश पाटील नरेश घरत, गोरक्षनाथ कडु, चंद्रकांत ठाकूर, प्रकाश कडु विजय कडु, संतोष घरत, संदीप कोळी, शाम म्हात्रे, अशोक घरत,पदाजी म्हात्रे, निलेश पाटील,बंटी पाटील, रमेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
