उद्या सुटणारी मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावणार!

रत्नागिरी : मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी अशी कोकण रेल्वे मार्ग रोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 4 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ऐवजी पनवेलपर्यंत धावणार आहे.

मध्य रेल्वेच्या हद्दीत विद्याविहार स्थानजीक गर्डर चढवण्याच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी मंगळूर मुंबई (12134) सुपरफास्ट एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातच संपणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ही गाडी या दिवसाच्या प्रवासापुरती रद्द करण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE