शिवतेज फाऊंडेशन व गुहागरवासियांकडून आयोजन
गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासून दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रतीवर्षा प्रमाणे यावर्षीही शिवतेज फाऊंडेशन गुहागरच्या वतीने दिपावलीच्या पुर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवार दि. १० रोजी संध्याकाळी ७ वाजता गांधी चौक, गुहागर येथे एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता आम्ही गुहागरवासीय, जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र येतो ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रपरिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन शिवतेज परिवारातर्फे करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. संकेत साळवी, श्री. राजेंद्र आरेकर, श्री. निलेश गोयथळे, श्री. संतोष वरंडे, श्री. गणेश धनावडे, श्री. विकास मालप, श्री. सुहास सातार्डेकर, ॲड. श्री. अलंकार विखारे,श्री. मनोज बारटक्के, श्री. प्रभुनाथ देवळेकर, श्री. अंकुश विखारे, राहुल कनगुटकर, सौ. उमा बारटक्के, श्रीमती श्रद्धा घाडे, श्रीमती सारिका कनगुटकर, ॲड. सुप्रिया वाघधरे, सौ. अरुणा पाटील, शिवतेज परिवार तसेच तमाम गुहागरवासी मेहनत घेत असतात.
