समाजसेवक रामनाथ पंडित यांच्याकडून गरजूंना फराळ व अन्नधान्य वाटप

उरण दि. १५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामनाथ पंडित हे गोरगरिबांना नेहमी मदत करत असतात.दिवाळी सणाचे औचित्य साधून गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी,गोरगरिबांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, त्यांच्या समस्या दूर करण्याच्या अनुषंगाने रामनाथ पंडित यांनी तारा गाव, जिते गाव तसेच विविध गावातील गरजूंना अन्नधान्य,कपडे,दिवाळी फराळ व मिठाई वाटप केले.

गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होऊन रामनाथ पंडित यांनी गोरगरीब जनतेची दिवाळी गोड केली आहे.एका निराधार जोडप्याला अनेक महिने मोफत अन्नधान्य व किराणा दुकानाचे सामान देखील ते घेउन देत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE