संदिप पाटील राज्यस्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित

उरण दि 15 (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यमुनाई फांउडेशन संस्कार वाचनालय नवी मुंबईतर्फे  गुरुव ज्ञाती हॉल,सेक्टर ९ ए,वाशी नवी मुंबई येथे राज्य स्तरीय मातृवंदन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी उरण तालुक्याचे सुपुत्र, आदर्श क्रिडा प्रशिक्षक संदिप पाटील यांना राज्य स्तरीय क्रिडा पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले.नोकरी करत असल्यामुळे संदीप पाटीप हे कामगार क्षेत्रात देखील कार्यरत आहेत.संदिप पाटील यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्याना बुध्दीबळ खेळाचे उत्तम असे प्रशिक्षण देऊन गुणवान विद्यार्थी घडविले आहेत.
बुद्धिबळ क्रिडा क्षेत्रात ते अनेक वर्षे कार्यरत आहेत. उरण तालुका चेस असोशिएशनची स्थापना करून भारतीय खेळ क्रिडा प्रकार असलेल्या बुद्धीबळ या खेळाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.अनेक ठिकाणी स्पर्धेत संदिप पाटील यांनी पंच म्हणून देखील काम केले. रायगड जिल्हा सेक्रेटरी व महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटनेचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. जेएनपीटीच्या माध्यमातून अखिल भारतीय मेजर पोर्ट ट्रस्ट स्पर्धेत त्यांनी उत्तम कामगिरी देखील केली आहे. या सर्व कार्याची दखल घेत यमुना फांउंडेशन वाशी नवी मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने संदीप पाटील यांना राज्यस्तरिय क्रिडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी यमुना फाउंडेशन वाशी, नवी मुंबई या सामाजिक संस्थेचे संस्थापक – ज्येष्ठ आगरी साहित्यिक मोहन भोईर,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ रंग कर्मी – रघुनाथ थत्ते , रामनाथ दराडे नाशिक,ज्येष्ठ कवी  अरुण म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे निवेदन दमयंती भोईर यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांनी केले.उरणचे सुपुत्र संदीप पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव होत आहे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE