भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी रत्नागिरी जिल्हाप्रमुख मनोज कदम यांचे दु:खद निधन

देवरुख : १९८८ च्या दशकात शिवसेना संघटना मजबूतीसाठी तत्कालिन तालुका प्रमुख रविंंद्र माने यांचे सह अहोरात्र झटणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणून ओळख असणा-या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन मोठा जनसंपर्क तयार करणा-या मनोज पर्शुराम कदम यांचे आज दु:खद निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५२ होते.

कालांतराने शिवसेंच्या विद्यार्थी सेनेचे काम सुरु केले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. त्यानी ती समर्थपणे पार पाडली. जिल्ह्यात विद्यार्थी संघटना मजबूत केली. शिवउद्योग सेनेच्या जिल्हा कार्यालयची उभारणीत मोठे योगदान देत जिल्हातील बेरोजगारीची नोंदणी करून अनेकांना मदतीचा हात दिला..

देवरुखजवळील आंबवचे सुपुत्र असणा-या मनोज कदम यांचा तालुक्यात मोठा मित्र परिवार आहे. गेल्या काही वर्षापासून ते नोकरीनिमित्ताने मुंबईत वास्तव्याला होते. आज मुंबईतच चुनाभट्टी येथिल घरी त्यानी अखेरचा श्वास घेतला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE