सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २९ डिसेंबरपर्यंत मुदत

रत्नागिरी, : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण 1 जानेवारी 2024 पासून येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सुरु होणार आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी जिल्ह्यातील युवकांकडून 29 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व व्हॉटसअप क्रमांक 9921330300 संपर्क साधावा, असे आवाहन मत्सयव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.

प्रशिक्षण तपशिल पुढीलप्रमाणे

प्रशिक्षण कालावधी दि 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 ( 6 महिने) असा असेल. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे ) उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ) क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. ( विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी. ) प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह रु. 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700 एवढे असेल. दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु. 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600 असेल. ( दारिद्रय रेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी पं. स. यांचा दाखला जोडावा ).

रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी

राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येतील. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात.

विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरुन त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेवून दि. 29 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी वर नमूद व्हॉटसअप किंवा ईमेलवर सादर करावेत. अधिक माहितीसाठी जी. द. सावंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, पेठ किल्ला, रत्नागिरी. ईमेल :- ftcrtn@gmail.com मोबाईल 9422371901 वर संपर्क साधावा.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE