मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष सोमवार २५ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, भाजपा कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, किसान मोर्चाचे राजाराम गरुड, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
