संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांच्या अक्षरयात्रा पुस्तकाचे पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशन

खा . सुप्रिया सुळे , आयोजक राजेश पांडे यांची उपस्थिती

संगमेश्वर दि. २४ ( प्रतिनिधी ) : पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणात १६ ते २४ डिसेंबर दरम्यान भरलेल्या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आज पुस्तक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी कोकणच्या संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांच्या चपराक प्रकाशित अक्षरयात्रा या पुस्तकाचे प्रकाशन खा. सुप्रिया सुळे, पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे , मिलींद मराठे, भालचंद्र कुलकर्णी, लेखक जे. डी. पराडकर, चपराकचे संपादक घनश्याम पाटील , अरुण कमळापूरकर , जयंत पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या कालावधीत १०० दिवसात जे . डी . पराडकर यांनी विविध विषयांवर सलग १०० लेख लिहीले होते. यातील निवडक ६४ लेखांचा समावेश अक्षरयात्रा या पुस्तकात करण्यात आला आहे . प्रसिध्द लेखक समीरबापू गायकवाड यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली आहे.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले असून २५६ पानांचे हे पुस्तक पुठ्ठाबांधणी स्वरुपाचे आहे . मूळ किंमत ४०० रुपये असली तरीही संपादक घनश्याम पाटील यांनी हे पुस्तक वाचकांसाठी ३०० रुपयात उपलब्ध करुन दिले आहे. चपराक प्रकाशन ७०५७२९२०९२ या नंबरवर ३०० रुपये गूगल पे करुन त्याचा स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवल्यानंतर अक्षरयात्रा पुस्तक घरपोच मिळणार आहे.

अक्षरयात्रा पुस्तक विक्रम करेल

कोकणचे लेखक जे . डी . पराडकर यांच्या लेखनात मोठी ताकद आहे. त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते चपराकने अक्षरयात्रा हे त्यांचे प्रकाशित केलेले पाचवे पुस्तक आहे. आज पुणे पुस्तक महोत्सवात अक्षरयात्राचे प्रकाशन झाले ही चपराकसाठी आनंदाची बाब आहे. प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक नक्कीच विक्रम करेल.

– घन: श्याम पाटील
संपादक , चपराक प्रकाशन पुणे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE