विज्ञानातून सत्यता पडताळून विद्यार्थी त्याकडे आकर्षित व्हावा म्हणूनच राष्ट्रीय विज्ञान दिन : श्रीकृष्ण खातू

संगमेश्वर दि. १ : प्रकाश किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र काही प्रकाश किरण सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणाहून वेगळ्या तरंगाचे असतात. यालाच रामन इफेक्ट असं म्हणतात. प्रकारचा विकीरणा संदर्भातील शोध २८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर वेंकट रामन यांनी लावला. म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . या दिनाचे औचित्य साधून शाळा तुरळ नंबर एक व शाळा तुरळ नंबर दोन मधील सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

खरंतर विज्ञानातील वेळोवेळी पडताळून त्यातील सत्यता ठाम समजून घेतल्यावर विज्ञान नक्की समजते. त्यासाठी या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी विज्ञानाकडे आकर्षित व्हावा हा महत्त्वाचा उद्देश आहे, असे मार्गदर्शन श्रीकृष्ण खातू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. त्यावेळी अनेक उदाहरणे व दाखले देऊन विज्ञानातील सत्यता पटवून दिली.
तसेच विज्ञानाचे जेवढे सोपे व सुलभ फायदे आहेत तेवढेच अतिरेक वापराचे तोटे कसे होऊ शकतात हे सुद्धा पटवून दिले.

आरोग्य, शेती, शिक्षण, प्रसार माध्यमे, मनोरंजन इत्यादी क्षेत्रात विज्ञानाचा वापर कसा होतो व विज्ञानाची असलेली व्यापकता,महत्व ,सद्धय्याचे गतिमान जीवन इत्यादी गोष्टी स्पष्टीकरणाने पटवून दिल्या. हल्ली नासा,इस्रो या संस्थेकडून चालत कार्य आपण समजावून घेऊया.अशा प्रकारच्या मार्गदर्शनात मुलांनी उत्तम सहभागी होऊन प्रतिसादही दिला.
या प्रसंगी केंद्रप्रमुख दीपक यादव फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रमुख दिलीप काजवे तसेच शिक्षक दीपक महाडीक, जयंत शिंदे, स्नेहा घडशी,मधुकर गडदे,हरिश्चंद्र नांदिवडेकर, गवळी,तेजस कांबळे, स्नेहल तुरळकर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE