आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे ९ नोव्हेंबरला गणेशगुळे येथे अनावरण

  • ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी :  आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेख अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. या वेळी शिवस्तुती पठण आणि विविध प्रात्यक्षिके असे कार्यक्रमही होणार आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये मंत्री नितेश राणे यांच्यासह माजी सरपंच सौ. श्रावणी विक्रांत रांगणकर याही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. पद्मजा अभ्यंकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष सौ. दीपा पाटकर, जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका सौ. मीरा भिडे, आणि कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. उमा दांडेकर यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE