रत्नसिंधूचे सदस्य किरण सामंत व माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायतच्या आवारातील व्यायाम शाळेचे उद्घाटन ९ रोजी पालमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्न सिंधूचे सदस्य किरण सामंत व माजी नगरसेवक सुदेश मयेकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती उक्षी गावच्या सरपंच सौ. किरण जाधव यांनी दिली.
उक्षी गावामध्ये व्यायाम शाळा व्हावी अशी तरुणांची अनेक वर्षे इच्छा होती.तरुणांची होणार गैरसोय लक्षात घेता तत्कालीन सरपंच मिलिंद खानविलकर आणि उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी व्यायाम शाळेच्या इमारतीसाठी विशेष पाठपुरावा केला होता. आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी उक्षी गावासाठी व्यायाम शाळा मंजूर केली होती.
तसेच व्यायाम शाळेतील साहित्यासाठी सरपंच सौ.किरण जाधव आणि माजी उपसपंच मंगेश नागवेकर यांनीही विशेष पाठपुरावा केला होता. व्यायाम शाळा पूर्ण झाल्यानंतर उद्या दिनांक ९ मार्च रोजी रत्नागिरी – रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे.आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रत्न सिंधूचे सदस्य किरण सामंत व माजी नगरसेवक सुदेश मयेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील मान्यवर,गावकर, वाडीप्रमुख,त्याचबरोबर तरुण आणि तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सौ. किरण जाधव यांनी केले आहे
