खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला कायमस्वरूपी जादा कोच

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गांधीधाम ते नागरकोईल या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला (१६३३६/१६३३५) स्लीपर श्रेणीचा एक कायमस्वरूपी कोच वाढवण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.


या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नागरकोईल येथून गांधीधाम मार्गावर धावताना दिनांक 19 मार्च 2024 च्या फेरीपासून तर गांधीधाम ते नागरकोईल या मार्गावर धावताना दिनांक 22 मार्च 2024 च्या फेरीपासून हा बदल लागू होणार आहे. रेल्वेने या गाडीला एक अतिरिक्त कोच जोडल्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE