माजी आमदार मीनाक्षीताई पाटील यांना उरणमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली

शोकसभेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण मध्ये समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात माजी आमदार मीनाक्षीताई पाटील यांची शोकसभा पार पडली. यावेळी प्रास्ताविक कामगार नेते संदीप पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी १९८४ साली शेतकरी आंदोलनात आमदार मीनाक्षीताई पाटील यांचे योगदान आणि त्यांना झालेली अटक तसेच बोकडविरा गावातील त्यांच्या आठवणी सांगितल्या.

तालुका चिटणीस विकास नाईक यांनी ताईंना चिटणीस झाल्यानंतर उरणमध्ये भेटलो त्यावेळी त्यांनी मला चांगले काम कर असे सांगितले. त्यांचा प्रेमळ स्वभाव मला भावला असे मत व्यक्त केले.कामगार नेते मेघनाथ तांडेल यांनी ताईंच्या कार्याचा गौरव करून कामे करण्याची पद्धती कशी होती तसेच प्रशासनावर वचक कसा ठेवायचा याबद्दलचे किस्से सांगितले.

यावेळी कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे, सत्यवान ठाकूर, ऍड विजय पाटील,रमेश ठाकूर आदींनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती नरेश घरत,उपसभापती महादेव बंडा, सहचिटणीस यशवंत ठाकूर,युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, रमाकांत पाटील,जीवन पाटील,नयन म्हात्रे, शहराध्यक्ष नयना पाटील, किशोर ठाकूर, मु ग पाटील,मनोहर पाटील,किशोर घरत, किरण घरत, शंकर भोईर आदी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मीनाक्षीताईंना अखेरचा सलाम करताना मीनाक्षीताई अमर रहे मीनाक्षी ताईंना लाल सलाम अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE