औरंगाबाद : येथील सिडकोतील रंजन वन हौसिंग सोसायटी, प्लॉट ३८ मधील गुलाबराव बाबुराव चव्हाण (वय ७८ ) यांचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
नातेवाईकांतर्फे त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. राज्यात जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ५५ वे देहदान आहे.
कै. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी सुमन गुलाबराव चव्हाण यांनी संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्यांचे पार्थिव सोपवले.
यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या स्व-स्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी उपस्थित होते. कै. चव्हाण यांचा मुलगा नितीन गुलाबराव चव्हाण, जिल्हा सेवा अध्यक्ष श्री साहेबराव आहेर , रमेशदास वैष्णव, सौ. निर्मला तरटे, निर्मला खंडागळे, वैभव जामवाडीकर, राहुल रहाणे, विनय अधाने, शिवाजी ठोबरे, गणेश सांगळे , संतोष मोटे, राहुल काळे, संजय निकम, ज्ञानेश्वर जाधव, चोपडे काका, संप्रदायाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. संप्रदायाच्या वतीने देहदनाबद्दल कै गुलाबराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. श्रद्धांजली वाहिली.
मृत्यूनंतरही आपण लोकांच्या उपयोगी पडण्याचे आवाहन जगद्गुरू नरेन्द्राचार्यजी महाराज यांनी भक्तांना केले होते. देहदान केले तर त्याचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. त्याला भक्तांनी देहदनाचे अर्ज भरून मोठा प्रतिसाद दिला होता. त्यातील आजपर्यंत मृत्यू पावलेल्या ५५ जणांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे.
