पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त
लांजा : लांजा आसगे दाभोळे राज्य मार्गावरील ‘हिट ऍन्ड रन’च्या घटनेत दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज असूनही बेदरकारपणे ठोकर देऊन दोन जणांचा बळी घेणाऱ्या त्या वाहनचालक वर कारवाई झालेली नाही.

या राज्य मार्गावर दोन वर्षात ४ जणांना जीव गमवावा लागला आहे तर 10 हून अधिक गंभीर अपघातात काही जण जखमी झाले आहेत. लांजा -आसगे दाभोळे राज्य मार्ग लांजा तालुक्यात अतीशय धोकादायक मार्ग म्हणून पुढे आला आहे. आरटीओ आणि पोलीस यांनी गंभीर अपघात होऊनही राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्यास कोणतीच हालचाल झालेली नाही.
आसगे येथे झालेल्या आपघात प्रकरणी आता येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्यसाठी आमदार राजन साळवी यांच्याकडे तळवडे माजी सरपंच आणि शिवसेनेचे सहकार तालुका अध्यक्ष संजय पाटोळे यांनी लक्ष वेधले आहे. दि 28 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता आसगे येथे एका वळणावर लांजा-कोर्ले थिठा येथून दाभोळे येथे जाणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला चिरडले होते. या घटनेत गोविळ लांजा येथील अशोक जाधव आणि प्रकाश जाधव याचा मृत्यू झाला होता. लांजा कोर्ले फाटा, धुंदरे लाकूड गिरण,आसगे येथील कोत्रे दुकान या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 28 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 3 वाजता दरम्यान सीसीटीव्ही फुटेज लांजा पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे.
सापुचेतळे येथून चिरा वाहतूक करणारी अनेक आसगे दाभोळे मार्गावर धावत असतात बेकायदेशीर चिरा वाहतूक सुरू असते या मार्गावर आरटीओ आणि देवरुख पोलीस यांचे वाहन गस्ती घालत असते. मात्र, अवजड अवाजवी लोड विरोधात कोणती कारवाई करण्यात आली, हा प्रश्न उपस्थित होत आहे वेगवान सहा चाकी वाहने यामुळे अनेक अपघात या मार्गावर होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या च्या दुर्लक्ष मुले हा रस्ता अतिशय खराब मोठे खड्डे पडले आहेत. तळवडे घाटात तर रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे.
पावसाळ्यात बांधकाम खाते माती दगड टाकून तात्पुरती मलम पट्टी केली जाते. मोठया पावसाने येरे माझ्या मागल्या संजय पाटोळे यांनी आसगे जाधव अपघात प्रकरणी उच स्तरीय चौकशीची मागणी केली आहे. लांजा राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी यांना या बाबाबत भेट घेऊन चर्चा केली आहे
