मंडणगड : मंडणगड तालुक्यातील तुळशी- माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर पावसमुळे रस्त्यावर आलेली दरड दगड व माती हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटासह राजापूर तालुक्यामधील कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात रस्त्यावर दरड आल्यामुळे या दोन्ही घाट रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कोल्हापूर राजापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक तेथील दरड हटवून सुरळीत करण्यात शुक्रवारी सायंकाळी उशिराने यश आले.
याचबरोबर मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटात कोसळलेली दरड जेसीबीच्या मदतीने हटवण्यात आली असून आता या घाट रस्त्यावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू झाली आहे.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- Konkan Railway | मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन आरवलीजवळ बिघडले
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
