- लांजा पोलीस ठाण्यामध्ये बँकेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
लांजा : लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये २५ हजार ५०० रुपयाच्या नकली नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी लांजा येथील पराग चंद्रकांत राणे (३२, रा. खावडकरवाडी तालुका लांजा) यांच्यावर यांच्यावर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
खोट्या नोटा बाळगल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे सारस्वत बँकेचे लांजा शाखा अधिकारी नरेंद्र प्रदीप सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार दि. १५ जून रोजी पराग चंद्रकांत राणे यांनी ९ वाजून पाच मिनिटाच्या सुमारास लांजा येथील सारस्वत बँकेच्या रोकड डिपॉझिट मशीनमध्ये पंचवीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जमा केल्या होत्या. परंतु बँकेच्या डिटेक्टिव्ह मशीनमुळे या खोट्या नोटा असल्याचे सिद्ध झाले.
सारस्व बँक शाखेने सीसीटीव्ही फुटेजद्वारे पडताळणी करून सदरच्या नोटा खोट्या असल्याचे निष्पन्न केले बँक प्रशासने तातडीने दिनांक 16 जून रोजी ही फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी अधिक तपास करून आज दि 18 जून रोजी या व्यापाऱ्यावर भादवि कलम 489 ब आणि 489 क अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पराग राणे यांनी 51 नोटा खोट्या नोटा बाळगल्या.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार खोट्या-नोट्या बाळगणे बेकायदेशीर आहे. यासंदर्भात लांजातील व्यापारी पराग चंद्रकांत राणे वय 32 व्यवसाय व्यापार यांच्या अटकेची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घूटूकडे करीत आहेत.
