दादरपासून पुढे तुतारीप्रमाणेच असणार थांबे
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष रेल्वे गाडी शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी धावणार आहे. एकूण 18 डब्यांच्या या विशेष गाडीला सहा जनरल डबे असतील. या विशेष गाडीचे आरक्षण शुक्रवारी सुरूही झाले झाले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी (01171) ( 21 जूनच्या मध्यरात्रीनंतर ) दिनांक 22 जून रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती सिंधुदुर्गात सावंतवाडी टर्मिनसला ती दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (01172) सावंतवाडी येथून दि. २२ जून रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दि. २३ रोजी तीन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
या स्थानकांवर थांबणार विशेष गाडी
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
एकूण १८ डब्यांच्या या विशेष गाडीला सहा डबे सर्वसाधारण श्रेणीतील ( जनरल) तर उर्वरित वातानुकूलित+एस एल आर चे असतील.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
