तालुक्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्र आणि ग्रामपंचायतीमध्ये दाखल्यांसाठी शिबिर कार्यक्रम जाहीर
लांजा : लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजा तहसील मध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांची मागणीनुसार आज तातडीनं लांजा तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्रत्येक महा-ई-सेवा केंद्र आणि ग्रामपंचायतीमध्ये,मध्ये शिबिर घेण्याची कार्यक्रम निश्चित केला आहे.


लांजा येथील नगरसेवक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेश हळदणकर यांनी लांजा तहसीलदार यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शिबिर घेण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते त्याची तातडीने लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी दखल घेऊन या संदर्भात महा-ई-सेवक केंद्र आणि ग्रामपंचायत शाळा येथे उत्पन्न दाखला फॉर्म भरणे संदर्भात शिबिर कार्यक्रम निश्चित केला आहे.
