बळीराजा संघाच्या कृषिदुतांकडून  माखजन येथे कृषी दिन कार्यक्रम

  • गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ अंतर्गत उपक्रम

आरवली : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ तर्फे बळीराजा संघातील कृषी दुतांनी आदर्श मराठी शाळा माखजन येथे महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी शाळेत शनिवार दि. 29 जून रोजी कृषी संबंधी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

कृषी दिनानिमित्त शाळेत प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषी दिनानिमित्त मराठी शाळा ते माखजन बस स्टॅन्ड पर्यंत “जय जवान जय किसान” ” इडा पिडा टळु दे ,बळीच राज्य येऊ दे” अशा घोषणा देत कृषीदिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. कृषी दूत ओंकार सत्रे यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गावाचे प्रथम नागरिक श्री महेशजी बाष्टे उपस्थित होते. तसेच उपसरपंच मा. सौ पूजा ढेरे, शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा सौ वैष्णवी चव्हाण, शालेय केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड, गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष विशाल रांजणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक, आणि शाळेतील मुख्याध्यापिका नांदिवडेकर मॅडम व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE