- दुरवस्थेला बांधकाम विभाग व ठेकेदार जबादार : विकास सुर्वे
आरवली : धुव्वाधार पावसामुळे, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम यांच्या बेजबाबदार पणामुळे आरवली कुंभारखाणी बु, कुचांबे, राजीवली, येडगेवाडी रस्ता पूर्ण धोकादायक बनला असून याला पूर्ण जबाबदार बांधकाम खाते देवरुख आणि रस्त्यावरील अर्धवट बांधलेली मोरी व्यवस्थेचे ठेकेदार आहेत, असा गंभीर आरोप माजी उपसभापती श्री. विकास सुर्वे यांनी केला आहे.
या रस्त्यावर १५ मे नंतर पावसात केलेले डांबरीकरण मोऱ्यांचे दोन्ही बाजूचे निकृष्ट बांधकाम, सार्वजनिक बांधकाम देवरुख विभाग यांचे दुर्लक्ष आणि गड
नदीकिनारी असलेली झाडी तोडून धोकादायक झालेला गडनदी प्रवाह, न बांधलेली सौरक्षक भिंत यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. निकृष्ट मोरी बांधकाममुळे एसटी व्यवस्था बंद पडणार आहे. विध्यार्थी शाळेपासून वंचित राहणार असून त्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार बांधकाम खाते व ठेकेदारराहतील, असा आरोपही श्री. सुर्वे यांनी केला आहे.

कालच्या पावसात कुंभारखाणी बु चे सरपंच अनिल सुर्वे यांनी मुरडव सरपंच नितीन मेणे व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून देवरुख बसमधील प्रवाशांची माहिती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुरडवचे सरपंच व पोलीस पाटील यांनी प्रवाशांना खाजगी वाहनाने असुर्डे मार्गे राजीवलीपर्यंत धोका स्विकारून पोहचवले.
आरवली -राजीवली रस्त्यावर नव्याने झालेल्या फरशांचे काम अर्धवट असून व्यवस्थित नसल्यामुळे तेथे रस्ता खचत आहे. तसेच पाताळी गडनदी येथील संरक्षण भिंत मंजूर असूनही कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदार पणामुळेबांधली गेली नाही.खोदकाम करून ठेवले आहे व काम अर्धवट आहे त्यामुळे तेथे रस्त्याची नदीच्या पाण्यामुळे धूप होत आहे त्यामुळे रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावित्री नदीवरील मृत्यू तांडव गडनदी पात्त्रात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या, विध्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे व रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.
ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आणून देऊनही त्यावर कोणतीही दखल घेतली जात नाही , ही गंभीर बाब आहे. सदर आपत्कालीन बाब कुंभारखाणी बु . चे ग्रामसेवक राजेंद्र चौधरी यांनी गटविकास अधिकारी भरत चौगुले यांना कळवली व त्यांनी काही मदत लागल्यास तातडीने कळविण्यास सांगितले. तसेच तलाठी श्री. वैभव शेंडे यांनी सरपंच यांच्याशी संपर्क साधून तहसीलदार कार्यालयाकडे रिपोरटींग केले आहे.
रस्त्याची ही स्थिती लक्षात घेता शासनाला अपघात झाल्यावर जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल परिसरातील जनतेला पडला आहे.
