रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर बुधवारी पेडणे येथील बोगद्यात पाणी येऊन विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सुरळीत होत आहे. मडगाव येथून मुंबईसाठी गुरुवारी सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस तसेच मंगळूर येथून मुंबईसाठी सुटणारी सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने कळवले आहे.
गोव्यातील पेडणे येथील बोगद्यामधील पाण्याचा अडथळा दूर करून बुधवारी रात्री रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अजूनही कोलमडलेले वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 11 जुलैची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22230) तसेच मंगळुरू येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणारी दैनंदिन सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी (12134) रद्द करण्यात आली आहे.
अन्य मार्गाने वळवलेली ही गाडी धावणार कोकण रेल्वे मार्गे
पेडणे येथील पनवेल मध्ये उद्भवलेले समस्येमुळे रेल्वेने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या अन्य मार्गाने वळवल्या होत्या. त्यामध्ये तिरुअनंतपुरम ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीनपर्यंत धावणारी एक्सप्रेस गाडी (22633) जिचा प्रवास काल दिनांक 10 जुलै रोजी सुरू झाला आहे, ती आता कोकण रेल्वे मार्ग सुरळीत झाल्याने याच मार्गाने धावत त्याचे रेल्वेकडून करण्यात आले आहे
