लाडक्या बहिणींसाठी खूषखबर..! १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान योजनेचे दोन्ही हप्ते बँक खात्यात!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली असून योजनेचची जुलै ऑगस्ट अशी दोन महिन्यांची ₹ ३००० ही रक्कम दि. १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान आधार शी जोडलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

योजनेतील बदलानुसार आणखी शिथिलता आता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करुन दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्टदरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE