लांजा : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लांजा येथे दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी तालुका प्रशसान वतीने पोलिस वसाहत येथे संकल्प सिद्धी सभागृह येथे या जनता दरबाराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी जनता दरबारात सहभागी व्हावे, असे तहसिलदार प्रमोद कदम यांनी कळविले आहे.
