हॉटेलला लागलेल्या आगी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोस्टगार्ड अभियंत्याने वाचवले ग्राहकांचे प्राण!

रत्नागिरी रेल्वे स्टेशन नजीकच्या हॉटेलमधील दुर्घटना

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशननजीक एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून हॉटेलमधील ग्राहकांना सुरक्षितपणे बाहेर काढून आणि प्रसंगावधान दाखवत संभाव्य धोका टाळला. ही धाडसी कामगिरी बजावणणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील अभियंता हरदीप सिंग यांचे कौतुक होत आहे.

रत्नागिरी रेल्वे स्टेशननजीक राजभोग हॉटेल आहे. बुधवारी रात्री 9 वाजता सुमारास या हॉटेलमध्ये किचनमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. याचं हॉटेलमध्ये रत्नागिरी भारतीय तटरक्षक जवान आणि कर्मचारी यांचे कुटुंबीयांसमवेत स्नेहभोजन पहिल्या मजल्यावर सुरु होते. यावेळी अन्य ग्राहकही या हॉटेलमध्ये डिनर करत होते. हॉटेल किचनमधूण अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा सुरू झाल्याने सर्वाचीच धावपळ उडाली.

भारतीय सीमा सुरक्षा दलात अभियंता पदावर कार्यरत असलेले श्री. हरदिप सिंग यांनी यावेळी प्रसंगावधान राखून हॉटेलमध्ये असलेल्या अग्निशामक सिलेंडरचा उपयोग करून सर्व प्रथम आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यातच त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. सर्व ग्राहक यांना स्वत: श्री हरदिप आणि सीमा सुरक्षा दलाचे इतर जवान यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. याचदरम्यान हॉटेलमधील फर्निचरने पेट घेतला होत. परंतु सीमा सुरक्षा दलाचे अभियंता हार्दिक सिंग यांनी धाडसी कामगिरी करून हॉटेलची आग आटोक्यात आणली.

श्री. हरदिप हे पंजाबमधील असून सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी कोस्ट गार्ड येथे जहाज दुरूस्ती विभागाचे अभियंता आहेत. गेली तीन वर्षे ते या ठिकाणी कार्यरत आहेत. हॉटेलमध्ये लागलेल्या आगी प्रसंगी प्रसंगावधान दाखवत हरदिप यांनी दाखवलेल्या धाडसाची प्रशंसा होत आहे. त्यांच्या प्रसंगावधानामुळेच जीवीत आणि टळण्यासह हॉटेलचे मोठे नुकसान होणे टाळले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE